Saturday, April 18, 2026
spot_img

गीत व जागृती काशिवार यांची नवोदय विद्यालयात निवड

सडक अर्जुनी, (गोंदिया) : सडक अर्जुनी तालुक्यातील लोकसेवा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोसमतोंडी येथील इयत्ता पाचवी वर्गामध्ये शिकत असलेल्या गीत रविंद्र काशिवार व जागृती देवदास काशिवार या विद्यार्थीनींची सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रामध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत उत्तुंग यश मिळवून वर्ग सहावीच्या प्रवेशासाठी निवड निश्चित झाली आहे. गीत रवींद्र काशिवर व जागृती देवदास काशिवार या विद्यार्थींनी अतिशय हुशार, बुद्धीमान व संयमी शैक्षणिक क्षेत्रात भाषण -संभाषण कौशल्य, मृदूभाषी व नम्र स्वभाव गुणांच्या असून अपेक्षेप्रमाणे त्यांना यश मिळाले व त्याची निवड झाली आहे. त्यांचे यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थींनींचे आई-वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी म्हणाले. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. पाठक व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ व भेट वस्तू भेट देऊन सत्कार करुन अभिनंदन केले. तसेच पुढील शिक्षणासाठी व उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थींनींचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular