Thursday, September 17, 2026
spot_img
spot_img
spot_img

चार आरोपीसह दोन ट्रॅक्टर वन विभागाच्या जाळ्यात

गोंदिया : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या कोसमतोंडी सहवन क्षेत्रातील गोंगले नियत क्षेत्रात रेंगेपार झुडपी जंगल परिसरात रात्र विशेष सामूहिक गस्त करत असताना रात्री 11.50 वाजताच्या सुमारास दोन ट्रॅक्टर अवैध रेती भरताना रावजीनाला परीसरात आढळुन आले. सदर ट्रॅक्टर वनाधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी पकडून वनरक्षक हिवराज गायधने यांनी सदर चार आरोपीवर गुन्हा दाखल केले. गोंदियाचे सहाय्यक वनसंरक्षक सचिन डोंगरवार यांच्या मार्गदर्शनात सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, कोसमतोंडीचे क्षेत्र सहाय्यक फुलचंद शेंडे , गोंगले चे वनरक्षक हिवराज गायधने , नितेश ठवकर, सारिखा नागपुरे, महेश पाटील, वनमजूर विजय पुस्तोडे, चुळामन पुस्तोडे, श्यामकुवर कवरे कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular