Wednesday, April 29, 2026

सप्तखंजरी वादक सत्यपालजी महाराज यांचा समाज प्रबोधनात्मक जाहिर कीर्तन कार्यक्रम १४ रोजी

गोंदिया : तालुक्यातील ग्राम एकोडी येथे राष्ट्रीय सुप्रसिद्ध प्रबोधनकार सप्तखंजरी वादक सत्यपालजी महाराज यांचा समाज प्रबोधनात्मक भव्य जाहिर कीर्तन कार्यक्रम बुधवार, १४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र जैन, उदघाटक आमदार विजय रहांगडाले, दिपप्रज्वलक आमदार विनोद अग्रवाल, तर विशेष अतिथि जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे, रंगमंच पुजक माजी जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले, जिप सदस्य अश्विनी रविकुमार (बंटी) पटले, राजेश कटरे सामाजिक कार्यकर्ता, भाजयूमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे, पंचायत समिति सदस्य अजाबराव रिणाईत, वंदना प्रकाश पटले, सरपंच शालु मुन्नीलाल चौधरी, एनसीपी प्रदेश सचिव विनोद हरिणखेडे, पवन मोरे, पंस सभापति मुनेश्वर रहांगडाले, तेजराम चौहान सभापति पंचायत समिति तिरोडा, जितेंद्र रहांगडाले सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति तिरोडा, जगदीश ( बालु ) बावनथड़े जिल्हा परिषद सदस्य, रमेश अंबुले माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, भाऊराव ऊके सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति गोंदिया, ओम पटले संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति तिरोडा, अशोक रिणाईत अध्यक्ष सेवा सहकारी संस्था, चंद्रकुमार अंबुले प्रापर्टी डीलर इत्यादि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितित हा कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाला गाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था एकोडी व ग्रामवासीयांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular