Sunday, June 7, 2026

आमदार राजकुमार बडोले यांची नुकसानग्रस्त गावांना भेट

सडक अर्जुनी, (गोंदिया) : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यात घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी 7 जून रोजी धानोरी व टेमनी या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान आमदार राजकुमार बडोलेंनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या व तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. नुकसान भरपाई तात्काळ देण्याबाबत सबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या. तसेच महावितरणच्या अडचणी आणि इतर समस्यांचे निराकरणही करण्यात आले. यावेळी समवेत पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, उपसभापती निशा काशिवार, जि.प. सदस्या सुधा रहांगडाले, माजी सभापती संगीता खोब्रागडे, कृऊबास सभापती अविनाश काशिवार, डि.यु. रहांगडाले, सरपंच चेतन पटले, सरपंच वासनिक,मंडळाध्यक्ष विलास बागडकर, गौरेश बावनकर, मनोहर काशिवार, तुकाराम ठाकरे, तेजराम खोब्रागडे, महेश पटले, नायब तहसीलदार जांभुळकर, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular