Wednesday, September 16, 2026
spot_img
spot_img
spot_img

शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम होणार जमा : खासदार पटेल यांच्या पाठपुराव्याला यश

गोंदिया : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव कार्यतत्पर राहून शेतकरी वर्गाच्या हिताचे काम खासदार श्री प्रफुल पटेल यांनी नेहमीच केले आहे. काल खासदार प्रफुल पटेल यांनी राज्याचे वित्त मंत्री व उपमुख्यमंत्री ना. मा. अजितदादा पवार यांच्याशी प्रलंबित धान बोनस संदर्भात सविस्तर चर्चा केली. या चर्चेचे फलस्वरूप सरकारने बोनसचे पैसे वितरीत करण्याचा निर्णय घेतला असून आजच शासनाच्या वतीने ९०० कोटी रुपयांचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन संस्थेला उपलब्ध होणार आहे. उर्वरित रक्कम आगामी १० दिवसात देण्याचे आश्वासन राज्याचे वित्त मंत्री व उपमुख्यमंत्री ना. मा.अजितदादा पवार यांनी दिले आहे तसेच लवकरात लवकर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये बोनसची रक्कम जमा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा महायुतीच्या सरकारने केली होती. शेतकऱ्यांना लवकरात लवकर धान बोनसचे पैसे मिळावे यासाठी खासदार प्रफुल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular