Monday, April 20, 2026
spot_img

सराईत दुचाकी चोरट्यास अटक; 12 तासात चोरीचा गुन्हा उघड

गोंदिया शहर डी.बी. पथकाची कामगिरी
गोंदिया : के. टी. एस. रुग्णालयात ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 11 जून रोजी घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. डी.बी. पथकातील अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सराईत दुचाकी चोरट्यास अटक केली. त्याच्या ताब्यातुन चोरीस गेलेली 30 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. गणेश नरेंद्र मेश्राम (वय 29 वर्षे, रा. गौतमनगर गोदिया) असे आरोपीचे नाव आहे. मात्र, गोंदिया शहर डी.बी. पथकाने केवळ 12 तासाच्या आत चोरीचा गुन्हा उघड केला.
सविस्तर असे की, फिर्यादी जितेंद्र हिवराज वासनीक (वय 42 वर्षे, रा. गौतमनगर गोंदिया) यांची बजाज कंपनीची दुचाकी क्र. एम.एच.35/ डब्ल्यु 3314 कोणीतरी अज्ञात आरोपीने के.टी.एस. दवाखाना गोंदिया येथुन चोरून नेली. ही घटना 11 जून रोजी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. फिर्यादीच्या तक्रारीवरुन पो.स्टे. गोंदिया शहर येथे 12 जून रोजी रात्री अप.क्र. 423/2025 क. 303(2) भा.न्या.सं. 2023 अन्वये अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पो.स्टे. गोंदिया शहर येथील पोलीस निरीक्षक कशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरु केला. गोपनीय माहितीच्या अनुषंगाने दुचाकी चोरीचा सराईत आरोपी गौतमनगर येथील गणेश नरेंद्र मेश्राम (वय 29 वर्षे) यास अटक केला. त्याच्या ताब्यातुन चोरीस गेलेली 30 हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करुन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. डी.बी. पथकाने 12 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणुन प्रशंसनीय कामगीरी केली. सदर आरोपीविरुध्द यापुर्वीसुध्दा दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पो.हवा. सतीश शेंडे करीत आहेत. ही कामगीरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पोलीस हवालदार कवलपालसिंग भाटीया, सतीश शेंडे , सुदेश टेम्भारे , निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, दिपक राहांगडाले, शिपाही सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन, मुकेश रावते, अशोक राहांगडाले, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजारे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular