गोंदिया : महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबई, अंतर्गत घेण्यात येणाऱ्या डी.एम.एल.टी. या दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या परिक्षेचा निकाल 5 जुलै 2025ला लागला असुन या मध्ये एम.जी. पॅरामेडिकल काॅलेज मुर्री चैकी, गोंदियाच्या 98 टक्के निकाल लागलेला आहे. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या परिक्षेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी कु. निकीता राणे या विद्यार्थीनीने 90.22 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावीला आहे.
त्याच्यां पाठोपाठ कु. आचल येळे 89.22 टक्के, कु. साक्षी गौतम 88.44 टक्के, कु. अल्का भगत 87.78 टक्के, कु. गीता गहाने 86.33 टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे. जिल्ह्यात पॅरामेडिकल क्षेत्रात अग्रणी असलेल्या एम.जी. पॅरामेडिकल काॅलेजला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबईची मान्यता असुन दरवर्षी अनेक विद्यार्थी शासकीय नौकरीसाठी निवडले जातात. विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय काॅलेजचे संचालक अनील गोंडाणे व पालकांना दिले आहे. या यशासाठी प्राचार्य अनुसया लिल्हारे, प्रा. प्रीती वैद्य, प्रा. रामेश्वरी पटले प्रा. छाया राणा, प्रा. आरती राऊत, प्रा. ललीतकुमार डबले, प्रा. मनीष चैधरी, प्रा. सौरभ बघेले, प्रा. आकाश श्रोते, प्रा. सम्येक गणवीर, श्री राजु रहांगडाले, श्री राजाभाऊ उंदिरवाडे, श्रीमती योगेश्वरी ठवरे, व श्रीमती रूपाली धमगाये यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



