Friday, June 19, 2026

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल बोरगाव/बाजार येथे क्लस्टर लेवल स्पोर्ट्स स्पर्धेचे आयोजन

देवरी, (गोंदिया) : एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणा-या देवरी नजीकच्या बोरगाव/ बाजार येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या वतीने १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत क्लस्टर लेव्हल स्पोर्ट्स स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात क्लस्टरमधील अनेक E.M.R.S. संस्थांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला.
या स्पर्धेचे उद्धाटन उ‌द्घाटन एम. बी. पटेल कॉलेज, देवरी येथील शारीरिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अमित टेंभुर्णे यांच्या हस्ते पार पडले. यावेळीअमित टेंभुर्णे यांनी शारीरिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि वि‌द्यार्थ्यांना खेळांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा आणि ध्यानचंद यांच्या प्रतीमे समोर दीपप्रज्वलनाने झाली. या स्पर्धेत अँथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, कुस्ती, हँडबॉल इ. स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एकूण १० E.M.R.S. शाळांमधून ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात E.M.R.S. चामोर्शी सर्वाधिक पदके जिंकून एकूण विजेता ठरला. E.M.R.S. बोरगाव/बाजार या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेतील E.M.R.S. चामोर्शी आणि E.M.R.S. बोरगाव/बाजार यांच्यातील १९ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी अंतिम सामन्याने प्रेक्षकांनी आनंद घेतला. समापन समारंभ प्रसंगी एम. बी. पटेल कॉलेज, देवरी येथील शारीरिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अमित टेंभुर्णे, डिस्ट्रीक स्पोर्ट आँफीसर अनिराम मरसकोल्हे, ललिता मरसकोल्हे इ. मान्यवरांनी उपस्थित राहून विजेत्यांना पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान केली. या स्पर्धेत E.M.R.S. बोरगाव/बाजारचे प्राचार्य गणेश कुमार तोडकर यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि सहाय्यक शिक्षकांचे त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल कौतुक केले आणि पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता E.M.R.S. बोरगाव/बाजारच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाने आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular