Wednesday, April 29, 2026

डॉ. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त “फस्ट स्टेप लायब्ररीचे” उद्घाटन

गोरेगाव, (गोंदिया) : गोरेगाव येथील वैष्णव कॉम्पलेक्स परिसरात फस्ट स्टेप लायब्ररीला सुरूवात करण्यात आली. १२ ऑगस्ट रोजी डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. या लायब्ररीच्या माध्यमातून महानगराप्रमाणे वाचकांना वाचन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पत्रकार कविता लिचडे तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कलावती कोल्हटकर होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लायब्ररीचे संचालक शैलेंद्र नरवरे, बंटी कावरे, विनय खरे यांच्यासह वाचक, विद्यार्थी व परिसरातील गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी कविता लिचडे यांच्या हस्ते लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून वाचन संस्कृतीचे महत्व पटवून दिले. तर मुख्याध्यापक श्रीमती कोल्हटकर यांनी विद्यार्थी जीवनात वाचनाला महत्त्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचनाकडे लक्ष देवूून ज्ञानात भर पडावी, असे मत व्यक्त केले. लायब्ररीचे संचालक शैलेंद्र नरवरे यांनी गोरेगाव नगरातील विद्यार्थ्यांना महानगराप्र्रमाणे विविध प्रकारच्या वाचन सामुग्रीच्या माध्यमातून सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे सांगितले. वाचकांनी या लायब्ररीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मान्यवरांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular