गोंदिया : 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत दुर्गा/शारदा उत्सव साजरा होणार आहे. स्थापित दुर्गा/शारदा मुर्ती विसर्जन दि.2 ऑक्टोंबर ते 4 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत मोठ्या संख्येने छोटा गोंदिया भिमघाट पांगोली नदी, पिंडकेपार नाला, सरकारी तलाव (रेल्वे), मुर्री तलाव, खमारी तलाव, टेमणी घाट, गोंदिया आमगाव रोड (पांगोली नदी), बांधतलाव सुर्याटोला, हिवरा गाव तलाव, कोरणी रजेगाव नदी घाट, संत तुकडोजी तलाव, गायत्री मंदिर तलाव, बाघ नदी घाट, पवन तलाव, पांगोली नदी घाट, रोंढा नाला, साखरीटोला गाव नाला, धुकेश्वरी मंदिर तलाव, चुलबंद नदीघाट, डुग्गीपार गाव तलाव, महागाव तलाव, अर्जुनी मोरगाव गाव तलाव, नवेगावबांध तलाव, शिंगाडा तलाव, काशीघाट (गराडाटोला), खामतलाव, गिरजाबाई शाळेजवळील तलाव, कवलेवाडा, पांगळी, मुंडीपार, एकोडी तलाव या ठिकाणी मुर्तीचे विसर्जन होणार आहे. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची तसेच लहान मुलांची गर्दी होण्याची शक्यता असुन विसर्जन सायंकाळी व रात्रीचे वेळी होत असल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. तसेच रहदारीस अडथळा निर्माण होवू नये या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्या ठिकाठी विद्युत प्रकाशाची व्यवस्था तसेच बॅरीकेट्सची व्यवस्था करण्यात यावी, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी कळविले आहे.





