Tuesday, August 25, 2026
spot_img
spot_img
spot_img

धावत्या ऑटोरिक्षावर झाड कोलमडला; चालक जखमी

गोंदिया: मुसळधार पावसामुळे धावत्या ऑटो रिक्शावर झाड कोलमडून पडल्याने ऑटोचालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जखमी झाला. ही घटना शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगाव तालुक्यातील मुरदोली जंगल शिवारात वाघदेव देवस्थाना जवळ घडली. घटनेमुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती.
जिल्ह्यात कालपासून पावसाचा मुक्काम असून शुक्रवारी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाची नोंद करण्यात आली. त्यातच दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गोंदिया – कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील मुरदोली जंगल परिसरातील वाघदेव देवस्थानाशेजारी असलेला चिंचेचा झाड रस्त्याच्या मधोमध कोलमडून पडला. यावेळी महामार्गावरून जात असलेला ऑटो रिक्षा एमएच ३५ ए एच ०२३५ त्या झाडा खाली आल्याने ऑटोच्या समोरील भागाचे नुकसान झाले. या अपघातात चालकाच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी ऑटोमध्ये दोन महिला प्रवासी असल्याची माहिती असून त्यांना कसल्याचे प्रकारची इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी ऑटोचालकाला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जवळपास एक ते दिड तास ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. घटनेची माहिती गोरेगाव वन विभाग व पोलिस प्रशासनाला देण्यात आली. दरम्यान, वन विभागाच्या पथकाने व वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. बातमी लिहीपर्यंत जखमी चालकाचे नाव कळू शकले नाही. मात्र, सदर ऑटो रिक्शा गोंदिया येथील मंगल लिंगेकर यांचे नावे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular