Wednesday, September 16, 2026
spot_img
spot_img
spot_img

देवरीत ‘बाळा..! मीच तुझी आई रे..’ नाट्य प्रयोग ८ रोजी

देवरी, (गोंदिया) : देवरी येथील समाज मंदिर पंचशील चौकच्या पटांगणावर मानव कला नाट्य उत्सव मंडळाच्या वतीने दिवाळी पर्वानिमित्ताने शनीवार, ८ नोव्हेंबर रोजी धनंजय स्मृति रंगभूमी वडसा प्रस्तुत ‘बाळा… मीच तुझी आई रे… या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहेत.
या नाटकाचे उ‌द्घाटन प्रसंगी या क्षेत्राचे आमदार संजय पुराम, नगराध्यक्ष संजू उईके, विरेंद्र अंजनकर, आफताब (अन्नू भाई) शेख, अनिल बिसेन, अनिल येरणे, प्रवीण दहिकर, यादोराव पंचमवार, प्रमोद संगीडवार, महेशकुमार जैन, रमेश ताराम, देवराज गुनेवार सविताताई पुराम, कल्पनाताई वालोदे, उषाताई शहारे, संदीप भाटिया, शालिकराम गुरगुले, नितेश बालोदे, राजेश चांदेवार, पार्वताबाई चांदेवार, देवानंद मेश्राम, विठ्ठल हटवार, प्रवीण मेश्राम, सी. के. बिसेन, इंद्रजीत सिंग भाटिया, कृष्णदास चोपकर, सुजित अग्रवाल, प्रशांत संगीतवार, पुष्पकुमार गंगभोईर, राजेश रामटेके, प्रकाश ब्राह्मणकर, गौरव परसगाये, दादोराव गाडे आदि उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आनंद चांदेवार, गुरु कापगते, ओमप्रकाश रामटेके, गोपाल तिवारी, संतोष भुते, लक्ष्मण ब्राह्मणकर, महेश झिंगरे, रामेश्वर वाघाडे, लालमन शाहू, महेश फुंडे, सोनू शाहू, सोनू ठाकूर आदी उपस्थित राहणार आहेत. प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवराज जगणे, पुनम गिरी, कैलास नितीन मेश्राम, सतिष झिंगरे, संदिप शहारे, सुनिल वानखेडे, अशोक राऊत, अनिल मानकर, विजय राणे यांच्यासह मानव कला नाट्य उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular