गोंदिया : राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधून येत्या गुरुवारी (ता. 23) सकाळी 10 वाजता सडक अर्जुनी यथील आशिर्वाद लॉन येथे जिल्हास्तरीय पंचायत परिषद सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम् भंडारकर राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मेळाव्याला नागपुर जिल्हयातील खुर्सापार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुधीर गोतमारे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समिती सभापती सुरेश हर्षे, महिला व बालकल्याण समिती सभापती पौर्णिमा ढेंगे, समाजकल्याण समिती सभापती श्रीमती रजती कुंभरे, अर्थ व बांधकाम समिती सभापती डॉ. लक्ष्मण भगत, कृषी व पुशसंवर्धन समिती सभापती श्रीमती दीपा चद्रिकापूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रमिला जाखलेकर उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती चतन वडगाये, गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले, तिराडा पंचायत समितीचे सभापती तेजराम चव्हाण, अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या सभापती आम्रपाली डोंगरवार, देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन, आमगाव पंचायत समितीच्या सभापती योगिताबाई पुंड, गोरेगाव पंचायत समितीच्या सभापती चित्रलेखाताई चौधरी, सालेकसा पंचायत समितीच्या सभापती बिना कटरे, तथा जिल्हा परिषदेचे माननीय सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामपंचायत पर्यंत पोचविणे, सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना विविध विषयावर मार्गदर्शन करणे तथा त्यामाध्यमातून ग्रामपंचायतीना सक्षम बनविणे हा पंचायत परिषदेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मधुकर वासनिक यांनी दिली. जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी सरपंच मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.





