Saturday, May 9, 2026

गोंदियात 19.7 ग्रॅम एमडी क्रिस्टल पावडरसह आरोपीला अटक; 4.43 लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया : शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत संजयनगर, गोविंदपूर येथील आरोपी असलान उर्फ बाबू इकबाल खान (वय 21) याच्या घरातून 19.7 ग्रॅम एमडी क्रिस्टल पावडर जप्त केली. या पदार्थाची किंमत 4 लाख 33 हजार 400 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीला अटक करून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 19.7 ग्रॅम एमडी (क्रिस्टल) पावडरसह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत एकूण 4 लाख 43 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजयनगर गोविंदपूर येथील रहिवासी असलान उर्फ बाबू इकबाल खान (वय 21) हा मादक पदार्थांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत असताना ही माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता बेडरूममधील लोखंडी पेटीत मटमैल्या रंगाचा पावडर आढळून आला. चौकशीदरम्यान आरोपीने तो एमडी (मेथॉडोन) क्रिस्टल पावडर असल्याची कबुली दिली. पोलिसांनी 4 लाख 33 हजार 400 रुपये किंमतीचे 19.7 ग्रॅम एमडी पावडर आणि 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 4 लाख 43 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव गेडाम करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गेडाम, डी.बी. पथकचे पुलिस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार, सहायक फौजदार कवलपालसिंग भाटिया, हवलदार सुदेश टेंभरे, दीपक रहांगडाले, निशिकांत लौंदासे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, सिपाही दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, कुणाल बारेवार, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनू नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे, विजय बिसेन यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular