Saturday, June 13, 2026

खासदार राजेंद्र जैन यांच्या प्रथम आगमनानिमित्त जल्लोषात स्वागत

गोंदिया : भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवण्याचे काम खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या आशीर्वादाने साकार झाले असून श्री राजेंद्र जैन यांची खासदार म्हणून निवड होणे हा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी व मित्रपरिवाराकरिता अभिमानाचा क्षण ठरला आहे.

नव निर्वाचित राज्यसभा खासदार श्री राजेंद्र जैन यांची अविरोध निवड झाल्यानंतर गोंदिया शहरात प्रथम आगमना निमित्त कार्यकर्त्यांचा उत्साह व जल्लोष ओसंडून वाहत होता.नव निर्वाचित खासदार श्री राजेंद्र जैन यांच्या निवास स्थानी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच मित्र परिवार उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात शहराच्या विविध मार्गाने निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांचा जल्लोष आतिषबाजी व ढोल ताश्याच्या गजरात व घोषणांनी वातावरण जल्लोषमय झाला होता. मार्गात विविध ठिकाणी व्यापारी गण, मित्रपरिवार, कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी मोठया उत्साहात भव्य स्वागत करून अभिनंदन त्यांचे केले.
महायुतीच्या वतीने खासदार पदी अविरोध निवड झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, राज्यात उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा ताई पवार, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, खासदार श्री प्रफुल पटेलजी, खासदार श्री सुनील तटकरेजी, नामदार श्री छगन भुजबळजी, खासदार पार्थ पवारजी, नामदार दिलीप वळसे पाटीलजी, सौ.वर्षाताई पटेल तसेच महायुतीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे नव निर्वाचित खासदार श्री राजेंद्र जैन यांनी आभार मानले व जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी पूर्ण जोमाने कामे करण्याचा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular