Monday, August 24, 2026
spot_img
spot_img
spot_img

‘मंडल यात्रे’चे गोंदिया जिल्ह्यात जल्लोषात स्वागत; ओबीसी, व्हीजेएनटी अन् एसबीसी हक्कांसाठी एल्गार!

गोंदिया : ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजातील विद्यार्थ्यांना व युवकांना त्यांच्या घटनात्मक अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी तसेच बी. पी. मंडल आयोगाच्या शिफारशींबाबत जनजागृती करण्यासाठी विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये ‘मंडल आयोग जनजागृती यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. यात्रेचे मुख्य संयोजक उमेश कोराम यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघालेली असून त्यांच्यासोबत प्रा. रमेश पिसे, विलास काळे, रोशन उरकुडे, श्री. पडोळे, अशोक काकडे आणि श्री. पाल यांचा सक्रिय सहभाग आहे. ३ ऑगस्ट रोजी भंडारा येथून निघालेल्या या भव्य यात्रेचे ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे आगमन झाले असता स्थानिक नागरिकांनी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे अत्यंत उत्साहात व भव्य स्वागत केले.
या यात्रेदरम्यान गोंदिया जिल्ह्यात ठिकठिकाणी कॉर्नर सभा व जनजागृती कार्यक्रमांचा धडाका पाहायला मिळाला. सकाळी १० वाजता एकोडी येथे भव्य कॉर्नर सभा पार पडल्यानंतर सकाळी ११ वाजता गोंदियातील ऐतिहासिक राणी अवंतीबाई चौक, ११.३० वाजता गोरेगाव, दुपारी १२.३० वाजता आमगाव, दुपारी २ वाजता सडक अर्जुनी आणि सायंकाळी ३ वाजता नवेगावबांध येथे सभांचे आयोजन करण्यात आले. या सर्व सभांमधून ओबीसींची जातनिहाय जनगणना, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर परखड चर्चा करण्यात आली. या यात्रेचा मुख्य उद्देश ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी समाजातील विविध समस्यांवर मात करणे आणि बी. पी. मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आजच्या परिस्थितीत किती आवश्यक आहे, याची जाणीव करून देणे हा आहे. याद्वारे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, ‘महाज्योती’ व ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ, शिष्यवृत्तीचे प्रश्न, ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर समाज, युवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती केली जात आहे. या मंडल यात्रेच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील अनेक प्रमुख बहुजन संघटना एकत्र आल्या आहेत. यामध्ये ओबीसी अधिकार मंच, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ, संविधान मैत्री संघ, भारतीय पिछडा शोषित संघ, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन, युवा बहुजन एकता मंच, सकल ओबीसी समाज, ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ आणि शिक्षण बचाव समिती यांचा सहभाग आहे.

यांनी केले सहकार्य…
यशस्वीतेसाठी ओबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे महासचिव मनोज मेंढे, शिशिर कटरे, कैलास भेलावे, सुनील पटले, बंटी पंचबुद्धे, ओबीसी महासभेचे इंजि. राजीव ठकरेले, ओबीसी सेवा संघाचे उपाध्यक्ष सी. पी. बिसेन,भुमेश शेंडे, निखिल बनसोड, संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, वसंत गवळी, युवा बहुजन मंचचे सुनील भोंगाडे, रवी भांडारकर, शिव नागपूरे, डॉ. भुमेश ठाकरे, नरेश परिहार, रवी पटले, अजाबराव रिनायत, महेंद्र बिसेन, हरीश ब्राम्हणकर, प्रकाश पटले, किरण मेश्राम, अशोक रिनाईत, पंकज मेश्राम, राजूभाऊ कटरे, अशोक लंजे, नगराध्यक्ष सचिन शेंडे, नगरसेवक चंदू चुटे, शिवसेना नेते डॉ. प्रशांत कटरे, लोधी समाज संघटनेचे रामेश्वर लिल्हारे, ऋषीकांत शाहू, बाबा बिसेन, अरुण पारधी, अमर वराडे, सावन डोये, सविता बेदरकर, भागचंद रहांगडाले आणि गौरव बिसेन या सर्व ओबीसी-बहुजन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम व सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular