Thursday, October 22, 2026
spot_img
spot_img
spot_img

‘ॲट्रॉसिटी कायदा’ विषयावर जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा 5 ऑक्टोबरला

गोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व सहायक आयुक्त समाज कल्याण गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 व सुधारित अधिनियम 2015 (ॲट्रॉसिटी) या विषयावर एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आमगाव रोड, पतंगा मैदान, गोंदिया येथे दि.5 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की हे राहणार आहेत. कार्यशाळेमध्ये इतरही मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यशाळेत तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यशाळेतील व्याख्यानाद्वारे सदर कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच कार्यशाळेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 व सुधारित अधिनियम 2015 (ॲट्रॉसिटी) ची प्रचार व प्रसिध्दी होण्यास मदत होणार आहे, असे समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular