Thursday, October 22, 2026
spot_img
spot_img
spot_img

साकोली येथील शासकीय गोदामातून तांदळाचे ३६१ कट्टे चोरी; १० आरोपी अटकेत

सडक अर्जुनी, (गोंदिया) : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील लाखांदूर फाट्यावरील शासकीय धान्य गोदामातून चोरट्यांनी तब्बल तांदळाचे ३६१ कट्टे चोरी गेल्याचे ३ ऑक्टोबर रोजी उघडकीस आले. पोलीसांनी याप्रकरणी १० लोकांना अटक केली आहे. पोलिस विभाग या प्रकरणाचा तपास सुरू असून कथित नेटवर्क पर्यंत पोलीस पोहचले असल्याचे दिसून येते. ५ लाख ४१ हजार ५०० रुपये किंमतीचे तांदळाचे चोरी प्रकरणात महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम.एच. ३५/ एजे ५१७० जप्त केली आहे. चोरी गेलेला तांदळामधून ५० टक्के तांदूळ जप्त केला आहे. उर्वरित तांदूळ आणि चोरीमध्ये वापर केलेल्या दुसऱ्या वाहनांची शोध सुरू आहे. ‌ ‌ दिपक चौधरी हे शासकीय धान्य गोदामांमध्ये पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना तांदळाचे कट्टे कमी दिसून आले. प्रत्यक्षात मोजणी केले असता तांदळाचे ५० किलो वजनाचे ३६१ कट्टे कमी आढळून आले. चोरट्यांनी गोदामाच्या मागिल बंद शटरचे नट बोल्ट काढून तांदळाचे कट्टे चोरुन नेल्याचे उघडकीस आले. तक्रारीवरून साकोली पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी तपास करुन या घटनेतील १० आरोपींना अटक केली आहे. यामध्ये कोसमतोंडी निवासी महेंद्र शिवचरण चौधरी, महेश विकास पुसाम, दिपक दवन वाघाडे, निकेश देवराम बावनकर, प्रदिप नंदकुमार बोधनकर,गोवर्धन चिंधुजी सयाम आणि वडेगाव (खांबा) निवासी नारायण नामदेव गहाणे,गिरोला (हेटी) निवासी राइस मिल संचालक संजयकुमार भैय्यालाल पुस्तोडे, नवेगावबांध निवासी राइस मिल संचालक रितेश रविशंकर जैस्वाल,साकोली निवासी राकेश दयाराम आगासे यांना अटक केली आहे. संजयकुमार पुस्तोडे व रितेश जैस्वाल हे राइस मिल संचालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरी करण्यात आलेल्या शासकीय तांदळाची कथित खरेदी, साठवण यांची तपासणी केली जात आहे. याप्रकरणातील कथित नेटवर्कचे मुख्य सुत्रधार कोण? चोरीच्या तांदूळाची खरेदी आणि यात कोण-कोण लोकांचा समावेश आहे. तसेच प्रशासनिक स्तरावर कोणाची भूमिका होती याचा खुलासा तपास पूर्ण झाल्यावर होईल. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर, पो. ना. स्वप्निल गोस्वामी, नरेंद्र झलके, सचिन राऊत धनविजय गणवीर आदिंनी केले आहे.

आता कारवाईकडे जनतेचे लक्ष…
या प्रकरणातील मुख्य आरोपी राइस मिल संचालक संजयकुमार भैय्यालाल पुस्तोडे हे सडक अर्जुनी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आहेत. तसेच तालुका शेतकी खरेदी विक्री समिती देवरी अंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे धान खरेदी केंद्र आणि माॅ वैष्णवी बहुउद्देशीय सहकारी संस्था गिरोला च्या नावाने धान खरेदी केंद्र आहे. या दोन्ही धान खरेदी केंद्राचे कारभार स्वतः सांभाळतात. बाजार समितीकडून वेतन घेत असून कार्यालयात नेहमीच गैरहजर असतात. शासकीय व निमशासकीय कर्मचारी जर पोलीस कोठडीत २४ तास असेल तर त्याला नोकरीतून निलंबित करण्याची तरतूद आहे. त्यामुळे संजयकुमार भैय्यालाल पुस्तोडे व रितेश शिवशंकर जैस्वाल यांचेवर जिल्हा उपनिबंधक गोंदिया अथवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ काय कारवाई करणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular