Monday, April 20, 2026
spot_img

जादुटोण्याच्या संशयावरून वृद्धाचा शस्त्राने खून; आरोपीला अटक

गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा/हेटी येथील घटना
गोंदिया : शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवार १७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा/हेटी येथे उघडकीस आली. आसाराम देऊ कांबळे (वय ६०, रा. हेटी (पालेवाडा) ता. गोरेगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत एका आरोपीला ताब्यात घेतले. दिनेश उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम (वय २४, रा. हेटी/पालेवाडा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, जादुटोण्याच्या संशयावरून आपण आसाराम याचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार मृत आसाराम कांबळे हा मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गावाजवळील जंगल शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेला होता. मात्र, सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत तो घरी परतला नाही. तर त्याने चारण्यासाठी घेऊन गेलेल्या शेळ्या मात्र घरी परतल्या. यावर आसारामच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांसह जंगलाकडे धाव घेतली. यावेळी त्यांना आसाराम चा मृतदेह जंगल परिसरात आढळून आला. ही घटना जंगल शिवारातील असल्याने व सदर परिसरात वाघाचा अधिवास असल्याने प्रथमदर्शनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात त्याच्या मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करत गावकऱ्यांनी घटनेची माहिती गोरेगाव वन विभागाला दिली. दरम्यान, वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता हा प्रकार घातपाताच्या असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ घाटून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाकडून गावात तपास केला असता मृत आसाराम कांबळे यांचा खुन आरोपी दिनेश उर्फ भुरु ताराम याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली. या आधारे पथकाकडून हेटी (पालेवाडा), मुंडीपार, भंड़गा, हलबीटोला (गोरेगाव) येथे शोध घेण्यात आला असता, मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास आरोपी भुरु ताराम हा हलबीटोला (गोरेगाव) येथील आपल्या मावशीच्या घरी मिळून आला. यावेळी त्यास गुन्ह्याबाबत विचारणा केली असता, सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिल्यानंतर जादुटोनाच्या संशयावरून आसाराम कांबळे यास डोक्याच्या मागे लोखंडी कुऱ्हाडीने मारून खुन केल्याचे कबुली जबाब दिले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने आरोपी दिनेश उर्फ भुरू यास अटक करून गोरेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

यांनी केली कारवाई…
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शरद सैंदाने, सहायक पोलिस निरीक्षक धिरज राजुरकर, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, विठ्ठल ठाकरे, दिक्षित दमाहे, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, सुबोधकुमार बिसेन, पोलिस शिपाई हंसराज भाडारकर, छगन विठ्ठले, राकेश इंदुरकर, सुनिल डहाके, चालक पोलिस हवालदार लक्ष्मण बंजार, चालक पोलिस शिपाई घनश्याम कुंभलवार, राम खंडारे यांनी कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular