Saturday, June 6, 2026

पारंपारिक लोकगीतांच्या तालावर भात लावणीला सुरुवात

‘ये बूढ़ माय परा लगावन जासे’ या पोवारी गीतांची गुंज…
गोंदिया : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी १ जुलैपासून भात लावणीला सुरुवात करण्यात आली असून शेतकरी, शेतमजुर पोवारी भाषेच्या पारंपारिक लोकगीतांच्या तालावर भाताची लागवड करीत आहेत. आजकाल पोवारी भाषेतील ‘या बुढगी माये परा लगावं जासे, घर भर आदमीच आदमी सेती पर येला चयन कहां से’ अशा प्रकारच्या लोकगीतांची धून शेत मळ्यात गुंजत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक भात आहे. येथील दीड लाखांहून अधिक शेतकरी कुटुंब भात शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागात शेतकरी आपली जुनी परंपरा जपताना लोकगीतांच्या तालावर मोठ्या आनंदाने भात शेती करीत असतात. परंतु, आधुनिक युगात पारंपारिक लोकगीते लुप्त होत चालली आहेत. म्हणजेच लोकगीते नवीन पिढीपासून दूर जात आहेत. गेल्या चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. आणि १ जुलैपासून जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी भात शेतीच्या कामाला वेग आला आहे. या दरम्यान शेतात पारंपारिक पोवारी भाषेतील लोकगीते ऐकू येत आहेत. गोरेगाव तालुक्यातील हिरापूर येथील अनेक शेतात पोवारी गाण्यांचा प्रतिध्वनी ऐकू येत आहे. ये ‘बूढ़ी माय परा लगावन जासे, घर भर आदमीच-आदमी सेती पर येला चयन कहां से’ ‘हे पोवारी लोकगीत गुंजत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आपली जुनी संस्कृती व परंपरा टिकवून ठेवण्यासाठी याचा अवलंब करतात. भात लागवडीदरम्यान पारंपारिक लोकगीत गायल्याने वातावरण अधिक सुंदर बनते व शेतात काम करताना शेतमजूरांना आळस पण येत नाही. त्यामुळे जास्त काम होते आणि आरोग्यही निरोगी राहते, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular