Thursday, September 17, 2026
spot_img
spot_img
spot_img

डॉ. परिणय फुके यांची गणेश मंडळाना भेट; श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन घेतले आशीर्वाद

गोंदिया : आमदार डॉ. परिणय फुके यांनी सोमवार, 1 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर गोंदिया शहरातील विविध मंडळांना भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच श्रींच्या चरणी नतमस्तक होवून आशीर्वाद घेतले.

यावेळी आमदार डॉ. परिणय फुके यांनीगोंदिया shar हिंद बाल गणेश मंडळ, गोयल चौक ब्राम्हण मोहल्ला गणेश मंडळ, दुर्गा चौक गणेश मंडळ, विनायक गणेश उत्सव मंडळ (देशबंधू वार्ड गोंदिया), श्री टॉकीज चौक गणेश उत्सव मंडळ, गांधी प्रतिमा गणेश उत्सव मंडळ, जय हो गणेश उत्सव मंडळ, शंकर चौक गणेश मंडळ तसेच चुडामण चौक गणेश उत्सव मंडळ येथे जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांनी प्रत्येक मंडळात सजवलेल्या आकर्षक मंडपांत भक्तिभावाने विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन घेताना अनोखा उत्साह आणि आनंद अनुभवला. या प्रसंगी सर्व मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक बांधवांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशी प्रार्थना केली.

यावेळी बंटी पंचबुद्धे, दीपक बोबडे, बाबा बिसेन, शिव शर्मा, अक्षय वासनिक, अशोक जयसिंघानी, नरेंद्र तूरकर, सुशील राऊत, अहमद मनिहार, निखिल राजगुरु, गुड्डू चांदवाणी, मंगेश श्रीवास, अंशुल बिसेन, संदिप श्रीवास, अर्पित पांडे, रितेश चोरनुले, मनीष पोपट, ऋषभ बिसेन, पंकज भिवगडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular