Tuesday, April 21, 2026
spot_img

सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे : आमदार राजकुमार बडोले

शेतक-यांना सुख समृध्दी दे, गणराया चरणी प्रार्थना 
अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : सध्याचे केंद्र व महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतक-यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे. सरकार चालविताना अनेक आर्थीक अडचणी असल्या तरी शेतक-यांविषयी शासन अनेक सकारात्मक निर्णय घेत आहे. आदिवासी संस्थांच्या धान चुका-यांच्या संदर्भात आपन मंत्रालयात संबधीत मंत्री व अधिका-यांसी भेटीगाठी करुन शेतक-यांच्या प्रश्नासाठी आपन पाठपुरावा करीत असतो. धान चुका-याचे काही पैसे सरकारने पाठविले असुन ते चार दिवसात शेतकरी यांचे खात्यावर जमा होणार असून उर्वरित चुकारेही लवकरच जमा होतील असा विश्वास आमदार बडोले यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील बोंडगांवदेवी येथील सार्वजनीक बाल गणेशोत्सव मंडळाला 72 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल त्यांनी या गणेशोत्सव मंडळाला 5 सप्टेंबर रोजी भेट देवुन गणरायाचे दर्शन घेतले. त्यावेळी आमदार बडोले बोलत होते. आमदार बडोले पुढे म्हणाले की माझ्या मतदार संघातील बोंडगावदेवी हे गाव गंगा जमुना मातेच्या नावांनी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे तीर्थस्थान आहे. अशा पवित्र गावात गेली 72 वर्षांपासून “एक गांव एक गणपती” ही संकल्पना प्रत्यक्ष राबविली जाते. ही बाब सर्वधर्म समभावाची असुन यामुळेच गावची एकता व अखंडता आजही टिकुन आहे. शासनाच्या स्पर्धात्मक नियमानुसार या गावातील गणेश मंडळाने अनेक पारितोषिक मिळविले आहे. यावर्षी सुध्दा हा मंडळ स्पर्धेत आहे. यावर्षीचाही बक्षिस आपल्याला मिळो असी प्रार्थना गणरायाकडे केली असल्याचे आमदार बडोले म्हणाले. सार्वजनिक बाल गणेशोत्सवानिमीत्त गावातील सेवानिवृत्त पोलीस पाटील माधवराव पाटील पुस्तोळे यांना 80 वर्ष पुर्ण झाल्याने त्यांनी गणेशोत्सवानिमीत्त संपुर्ण गावाला भोजनदान दिल्याने मंडळाचे वतीने आमदार राजकुमार बडोले यांचे हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लोकपाल गहाणे, यशवंत गणविर, विजय कापगते, होमराज पुस्तोळे, राधेश्याम भेंडारकर, ठाकुर ओमप्रकाशसिंह पवार, लैलेश शिवणकर, व्यंकट खोब्रागडे, राकेश लंजे, रत्नाकर बोरकर, राधेश्याम झोळे, शालीक बोरकर, यादोराव बोरकर, देवलाल मानकर तथा मंडळाचे कैलास घावळे, दिलीप बोरकर व संपुर्ण कार्यकर्ते व ग्रामवासी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular