Saturday, May 9, 2026

जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करताना एक वेगळ्या प्रकारचे समाधान लाभले : प्रजित नायर

माजी जिल्हाधिकारी नायर यांचा निरोप समारंभ
गोंदिया : शासनामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या या होतच असतात, मात्र काही अधिकारी आपल्या कामाने वेगळा ठसा उमटवीत असतात. गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करताना एक वेगळ्या प्रकारचे समाधान लाभले असल्याचे माजी जिल्हाधिकारी तथा सध्या अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका प्रजित नायर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वच काम एका जिल्हाधिकारी यांच्या कार्यकाळात होत नसून ती एक प्रक्रियेचा भाग आहे. आपल्या हातून चांगले व्हावे या भावनेतून काम करीत असल्याने जेवढे शक्य होईल तेवढे सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते यावेळी म्हणाले.

माजी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचा निरोप समारंभ आणि वर्तमान जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांचा स्वागत समारंभ जिल्हा नियोजन सभागृहात बुधवारी एका भावनिक वातावरणात पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, भारतीय वन सेवेचे अधिकारी प्रितमसिंग कोडापे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन मानसी पाटील, उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय अवधाने, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यावेळी मंचावर उपस्थित होते.

जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी प्रजित नायर गोंदियाला लाभले असून त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भरभरून कौतुक करत भावनिक होऊन श्री. नायर यांना निरोप दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मुरुगानंथम यांनी श्री. नायर यांच्यासोबत काम करताना बरेच शिकायला मिळाले आणि सकारात्मक पद्धतीने प्रशासन कसे चालवायचे याचा धडाही गिरवायला मिळाला असल्याचे म्हणाले. पोलीस अधीक्षक श्री. भामरे आणि श्री. नायर बॅचमेट असल्याने कामाचे समन्वयक साधण्यात फार मदत झाली असल्याचे मनोगत श्री. भामरे यांनी यावेळी व्यक्त केले. श्री. नायर दि.5 एप्रिल 2024 रोजी जिल्हाधिकारी म्हणून या जिल्ह्यात रुजू झाले. गोंदिया जिल्ह्यातील अतिशय क्लिष्ट झुडपी जंगल तसेच महसुलाच्या विषयात लक्ष देऊन बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या समस्यांचे निराकरण केले. तसेच श्री. नायर यांच्या कार्यकाळात महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त एकत्रित आलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या टीम वर्कमुळे एक वेगळी ऊर्जा दैनंदिन काम करताना दिसून आली. श्री. नायर यांच्या कार्यकाळात लोकसभा, विधानसभा तसेच नगरपालिकांचे महत्त्वपूर्ण निवडणुका झाल्या असून या अतिशय संवेदनशील काळात आपल्या अधिकाऱ्यांचे संरक्षण करीत नीपक्षपातीपणे निवडणुका पार पडल्या असल्याचे सांगीतले. तसेच मला त्याचे कार्यालयीन प्रमुख म्हणून अधिकारी पाठीशी असल्यास अधिनस्त असलेल्या अधिकाऱ्यांनाही काम करण्याचा उत्साह आणि चुका कमी करण्याची अप्रत्यक्ष जबाबदारी निर्माण होत असल्याचे मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यात नवीन तलाठी कार्यालय श्री. नायर यांच्या काळातच झाले असल्याचा उल्लेख केला गेला. तृतीयपंथांसाठी विशेष वसाहत येत्या काळात श्री. नायर यांच्या पुढाकाराने शक्य होणार असल्याचेही सांगण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बेहरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तलाठी संघटनेचे श्री. सोनवणे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात काम करण्याचा पहिलाच अनुभव असून जिल्ह्यातील प्रशासन सांभाळताना ज्याप्रमाणे श्री. नायर यांना सहकार्य केले त्याप्रमाणे सहकार्य मलाही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. निरोप समारंभानंतर जिल्हाधिकारी श्री. गोंदावले यांनी त्यांचे शासकीय वाहनचालक यांना त्यांची नायर यांचे सारखी होण्याचे औदार्य दाखवले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तहसीलदार समशेर पठाण यांनी केले तर आभार अप्पर तहसीलदार श्रीकांत कांबळे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular