Saturday, May 9, 2026

बलात्कार प्रकरणातील आरोपीला आजीवन कारावास

जिल्हा व सत्र न्यायालय (३) गोंदिया यांचा कठोर निकाल
गोंदिया : शहरात बलात्कार करणाऱ्या एका आरोपीला आजीवन कारावास आणि २० हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा मा. जिल्हा व सत्र न्यायाधिस श्री. गौतम सा. न्यायालय -३ गोंदिया यांनी सोमवार, ४ मे २०२६ रोजी सुनावली.
बलात्कार करणारा आरोपी लक्ष्मण उर्फ मुका ईसरु ब्राम्हणकर, वय ४७ वर्ष, रा. झोपलेल्या हनुमान मंदिर जवळ, गौतमनगर गोंदिया, यांनी दिनांक ०८/०५/२०२४ रोजी फिर्यादीचे अल्पवयीन मुलीस आपले घरी नेवुन घराचा दरवाजा आतून बंद करुन पिडीत मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याने फिर्यादीचे तक्रारीवरुन पो. स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक २८८/२०२४ कलम ३७६ (एबी) ३७६ (जे) भा.द.वि. सहकलम ६ बाल लैंगीक अत्याचार प्रतीबंधक कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंद करुन नमुद आरोपी विरुध्द दोषारोपपत्र मा. जिल्हा व सत्र न्यायाधिस ०२ न्यायालय गोंदिया येथे फौजदारी स्पेशल खटला क्र. १०५/२०२४ प्रमाणे खटला चालविण्यात आला.
सदर खटल्याचे सुनावणीत आरोपी लक्ष्मण उर्फ मुका ईसरु ब्राम्हणकर, वय ४७ वर्ष, रा. झोपलेल्या हनुमान मंदिर जवळ, गौतमनगर, गोंदिया याचे विरूध्द साक्षपुराव्यावरून दोषसिध्द झाल्याने दि. ०४/०५/२०२६ रोजी त्यास आजीवन कारावास आणि २००००/- रू. द्रव्यदंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास २ वर्ष अतिरीक्त कारावासाची शिक्षा ठोठावन्यात आली आहे. शिक्षा झालेल्या गुन्हयाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पुजा सुरळकर, यांनी केला आहे. खटल्याचे युक्तीवाद सरकारी अभियोक्ता श्री. सतिष घोडे, तसेच न्यायालयीन कामकाज मपोशी निता पोटफोडे यांनी केलेला असून उत्कृष्ट तपासाबाबत मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री. अभय डोंगरे, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. रोहिणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे ठाणेदार, पोलीस निरिक्षक श्री. किशोर पर्वते यांनी कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular