Thursday, April 30, 2026

राष्ट्रवादी दिनदर्शिकेचे आमदार बडोलेंच्या हस्ते प्रकाशन

अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 5 हजार दिनदर्शिकेचे प्रकाशन 23 डिसेंबर रोजी आमदार तथा माजीमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सडक अर्जुनी येथील कार्यालयात करण्यात आले. अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दिनदर्शिका ही दरवर्षी खा. प्रफुल्ल पटेल व राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात प्रकाशित केल्या जाते. यंदा या दिनदर्शिकेचे प्रकाशन आ. बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. या दिनदर्शिकामध्ये वर्षभरात येणारे सण, महापुरुष व संतांचे पुण्यतिथी व जन्मदिवस, पंढरपूरच्या आषाढी व कार्तिक वारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचे जन्मदिवस व बुथ कार्यकर्त्यांचे जन्मदिवसाचा विषेश उल्लेख करण्यात आलेला आहे. या दिनदर्शिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. प्रफुल्ल पटेल, राजेंद्र जैन यांच्या प्रतिमा मुद्रित करण्यात आलेल्या आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, किशोर तरोणे, योगेश नाकाडे, शुकदेव मेंढे, कालिदास पुस्तोडे, चुन्नीलाल येरणे, रामदास बोरकर, एकनाथ बोरकर व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी ही दिनदर्शिका तालुक्यातील प्रत्येक बुथवर प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी पोहोचवण्याचे नियोजन करावे, अशी सूचना आ. राजकुमार बडोले यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular