Sunday, April 19, 2026
spot_img

व्हॉईस ऑफ मीडियातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

गोंदिया : व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांसाठी काम करीत असून देशभरात संघटनेचे विस्तार वाढलेले आहे. पत्रकारांच्या अनेक प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असून व्हॉईस ऑफ मीडियाच्या पाठपुरावामुळे राज्य शासनाने पत्रकारांसाठी पत्रकार कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे. उर्वरित मागण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन संघटना काम करीत आहे. सोमवार ६ जानेवारी रोजी गोंदिया शासकीय विश्राम गृहात पत्रकार दिनी व्हॉईस ऑफ मीडियातर्फे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार संपादक विरेंद्र जायसवाल, संपादक मोहन पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्तीसगड राज्यातील पत्रकार ज्यांची काही दिवसापूर्वीच हत्या करण्यात आली या महेश चंद्राकर यांना उपस्थित संपूर्ण पत्रकारांकडून दोन मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आद्यपत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व पुष्प वाहून पूजन करण्यात आले. या प्रसंगी वरिष्ठ पत्रकार मोहन पवार यांनी आद्यपत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या आयुष्यावर बोलताना म्हणाले की, सध्या बातमीदारी किंवा पत्रकारीता ही एका क्लिकवर आली आहे. त्यामध्ये सोशल मीडियामुळे तर क्रांतीच झाली आहे. त्यानंतर आतातर सिटीझन जर्नालिस्ट हा प्रकार अस्तित्वात आला आहे. मात्र माध्यमे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक त्यानंतर सोशल मीडिया या तिनही माध्यमातून जातांना अधिक वेगवान झाली आहेत. मराठीमध्ये माध्यमांच्या स्थित्यंतराचा अभ्यास करताना बाळशास्त्री जांभेकर यांना विसरून चालणार नाही. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांनी, ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. आपल्या अध्यक्षीय संबोधणात वरिष्ठ पत्रकार व संपादक विरेंद्र जायसवाल म्हणाले की, आज बहुतांश लोकांच्या हातात मोबाइल आल्यामुळे पत्रकारितेचा कार्यक्षेत्र वाढलेले आहे. बातमी येण्याचा विस्तार ही वाढला आहे. पण त्यातून ही व्यावसायिक पत्रकारिता करणे वेगळे आणि बातमी सुचली म्हणून सोशल मीडियावर टाकने हा भाग वेगळा आहे असे म्हणाले. या प्रसंगी व्हॉईस ऑफ मीडियाचे सचिव रवि सपाटे, हरीश मोटघरे, शाहिद पठाण, उमा पवार, कविता लीचडे, किंजल मेहता, रितू वाघ, नवीन अग्रवाल, सुनील कावडे, नवीन दहीकर, राजेशकुमार तायवाडे, आरिफ पठाण, महेंद्र बिसेन, महेंद्र लिल्हारे, महेंद्र माने, बर्मन, अमित गुप्ता आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संजय राऊत यांनी केले तर आभार रवी सपाटे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular