देवरी, (गोंदिया) : देवरी तालुक्यातील गटग्रामपंचायत शिलापूर अंतर्गत येणाऱ्या बेलघाट/मेहताखेडा येथील तरुणाने शुक्रवार, १० जानेवारी रोजी उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता गोंदिया येथे उपचारादरम्यान आज, (ता. 12) त्याचा मृत्यू झाला. सचिन देवाजी भोयर (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे. देवरी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या ग्राम बेलघाट/मेहताखेडा येथील सचिन हा आई-वडिलांना एकुलता एक असून पोटाचा उदरनिर्वाह करण्याकरिता देवरी येथील शिवम् टी.व्ही.एस. मोटर्स शोरूम येथे कामाला होता. एक दिवसापूर्वी तरुणाने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केला होता. देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रविवार, १२ जानेवारी रोजी सकाळी अंदाजे ६ वाजे दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सचिश हा आई- वडिलाला एकुलता एक मुलगा असल्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसून पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.





