Thursday, August 27, 2026
spot_img
spot_img
spot_img

रेतीघाटावरून 7 पोकलैंड, 4 टिप्पर जप्त; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची कारवाई

3 कोटी 42 लाखांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया : तिरोडा तालुक्यात रेतीघाटाचा लिलाव झाला नसला तरी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल विभागाकडे केल्या होत्या. मात्र, महसूल विभाग याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून गोंदिया जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी शनिवार, ११ जानेवारी रोजी छापा मारून 7 पोकलैंड, 4 टिप्पर व हजारो ब्रास रेतीसाठा असा एकूण 3 कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिरोडा पोलिस ठाण्यात आरोपिंविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील रेतीघाटावरून २४ तास अवैधरीत्या रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल व पोलीस विभागाकडे केल्या होत्या. अवैध उत्खनन, रेतीची अवैधरित्या होणारी चोरी आणि वाहतूक तक्रारीच्या अनुषंगाने 11 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधिक्षक गोंदिया गोरख भामरे यांनी प्रत्यक्ष गोंदिया जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचे पथक व तहसील कार्यालय तिरोडा, पोलीस ठाणे तिरोडा येथील अधिकारी व अंमलदार, कर्मचारी पथकासह घाटकुरोडा व घोगरा येथील रेतीघाटावर धाड़ टाकली. दरम्यान नदीपात्राच्या अंदाजे 70 ते 100 मीटर अंतरावर टिप्पर व पोकलँडसह इतर यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले. यावरून 4 टिप्पर, 7 पोकलैंड मशीन तसेच यंत्रसामुपी व रेतीसाठाही जप्त करण्यात आला. या धाडसी कारवाईमुळे रेती तस्करांचा पर्दाफास झाल्याने जिल्ह्यातील रेती तस्कराचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. एकंदरीत या कारवाईत 3 कोटी 42 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या ५ पोकलैंड मशीन मालकाच्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत. तर 4 टिप्पर तहसिल कार्यालय येथे हलविण्यात येवून तिरोडा तहसिलच्या आवारात लावण्यात आले. याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेतर्फे गोंदिया जिल्ह्यातील इतर रेती घाट परिसरात बेकायदेशीररित्या आढळून आलेल्या वाळूसाठा, डम्पचे पंचनामे करून त्याबाबत कार्यवाहीकरिता अहवाल महसूल विभागाकडे सादर करण्यात आले आहेत.

11 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल…
वैनगंगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन, रेतीचा साठा वाहतूक करण्याचा उद्देशाने उभे असलेल्या 4 टिप्पर व 7 पोकलँन्ड दिसून आले. पोलीस ठाणे तिरोडा येथे फिर्यादी तहसीलदार नारायण ठाकरे यांचे तक्रारीवरून अवैधरित्या रेती चोरी करण्याचे प्रयत्नाचे प्रकरण संबंधात अपराध क्रमांक- 043/2025 कलम 303(2), 62, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या निर्देश सूचना आदेशाप्रमाणे तिरोडाचे पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि कोंडे करीत आहेत.

यांनी केली कारवाई….
सदरची कार्यवाही जिल्हाधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे प्रत्यक्ष उपस्थितत व मार्गदर्शनात तहसीलदार तिरोडाचे नारायण ठाकरे, पोलीस निरीक्षक अमित वानखडे, नायब तहसीलदार तिरोडा ए.पी. मोहनकर, मं. अ. मुडीकोटाचे पी.बी. निमजे, घोघराची तलाठी कु.बी.डी. पटले, सजु बान्ते बीट अंमलदार मुडीकोटा, ए.पी. भुते तलाठी- सराडी, मुडीकोटा, नवेगाव खुर्द श्री. रत्नदिप प्रकाश चौरे कोतवाल घोगरा यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular