Wednesday, April 29, 2026

टी-14 वाघिणीचा 20 महिन्याच्या बछड्याचा मृत्यू

कोहका-भानपूर परिसरातील घटना
गोंदिया : जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातंर्गत येत असलेल्या गोंदिया वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत कोहका-भानपूर परिसरात वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज 14 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ही माहिती मिळताच वनखात्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. टी-14 वाघिणीचा 20 महिने झालेला बछडा आकोहकाहे. या वाघाचा मृत्यु इन्फेक्शनने झाल्याचे सांगण्यात येत आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्राबाहेरचे हे क्षेत्र आहे. ज्याठिकाणी वाघाचा मृत्यू झाला, तो वाघांचा कॉरिडॉर आहे.
गोंदिया वनविभागातील दासगाव बीटमधील कोहका-भानपूर परिसरात 14 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास वाघाचा मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली. स्थानिकांनी वाघ मृत अवस्थेत आढळल्याची माहिती वन विभाग व संस्थेला दिली. घटनास्थळी चमू ने पाहणी केली. सदर वाघ हा निमवयस्क नर असून त्याची ओळख पटविण्यात आली आहे. हा नर वाघ टी-14 वाघिनीचा अंदाजे 20 महिन्याचा वाघ असल्याचे आहे. टी-14 वाघीण आपल्या बच्यांना घेवून नागझिराच्या पूर्व भागात राहत होती. काही दिवसांआधी हा नर वाघ दुसऱ्या मोठ्या नर वाघाच्या भीतीने वेगळ्या क्षेत्रात स्थलांतर झाला. घटनास्थळाची संपूर्ण पाहणी करून शवविच्छेदनाकरिता मृत वाघाला कुडवा येथील वन विभागाच्या वन उद्यान परिसरात आणून शव विच्छेदन करण्यात आले. यावेळी वाघ इन्फेक्शनने मृत झाल्याचे निदर्शनात आले. वाघाचे अवयव पुढील तपासाकरिता लॅबला पाठविण्यात येईल. घटनास्थळी उपवसंरक्षक प्रमोद पंचभाई, विभागीय वनअधिकारी दक्षता प्रीतमसिंघ कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक योगेंद्र सिंघ, मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, सहाय्यक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, सहाय्यक वनसंरक्षक अपर्णा पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक, तहसीलदार श्रीकांत कांबळे, अनिल दशेरिया, मुकुंद धूर्वे, रुपेश निंबार्ते, वनपाल संतोष श्रीवास्तव, पोलिस निरीक्षक ढाले, संजय टेकाम, संस्थेचे सुशील बहेकार, डीलेश कुसराम व संपूर्ण वनविभागाचे चमू उपस्थित होती. शव विच्छेदन पशू वैद्यकिय अधिकारी देवेंद्र कटरे, मेघराज तुलावी, कृपाण उइके यांनी सर्व चमुसोबत पार पाडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular