Thursday, April 30, 2026

बोलोरो पिकअपची दुचाकीला धडक; दोन चिमुकल्यासह आई जागीच ठार

गोंदिया : दुचाकी वाहनाला बोलोरो पिकअप गाडीने धडक दिल्याने दोन चिमुकल्यासह आईचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी आहे. ही घटना 26 जानेवारीला दुपारी 4 वाजेच्या दरम्यान नवेगावबांध अर्जुनी मोरगाव राज्य मार्गावरील नवेगावबांध शिवारात भारती बार व रेस्टॉरंट नजीक घडली. प्रजासत्ताक दिनी येरंडी देवलगाव येथील पंधरे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
नवेगावबांध येथून नजीकच्या येरंडी देवलगाव येथील संदीप राजू पंधरे (वय 29) हे दुपारी 4 वाजेच्या दरम्यान आपल्या स्वगाव येरंडीवरून नवेगावबांधकडे काही कामानिमित्त आपल्या पल्सर गाडी क्रमांक एमएच 35, एएम 2756 ने जात होते. त्याच्यासोबत दुचाकीवर पत्नी चीतेश्र्वरी संदीप पंधरे (वय 26), मुलगा संचित संदीप पंधरे (वय 5 महिने) व घरा शेजारी असलेली पार्थिवी रोहित सिडाम (वय 3 वर्ष) होते. ते दुचाकीने जात असताना मागून येणाऱ्या बोलोरो पीकअप गाडी क्रमांक एम एच 35, एजे 4482 या अज्ञात वाहन चालकाचा गाडीवर नियत्रंण सुटून दुचाकीला मागून जबर धडक दिली. यात दुचाकीवर स्वार असलेल्या चीतेश्र्वरी संदीप पंधरे, संचित संदीप पंधरे व पार्थिवी रोहित सिडाम यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. दुचाकी चालक संदीप पंधरे गंभीर जखमी झाले असून त्यांना ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच नवेगावबांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगिता चाफले व त्यांची चमू घटना स्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून तिन्ही मृतकाचे प्रेत शवविच्छेदनाकरिता नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताला कारणीभूत असलेल्या बोलोरों पीकअप चालक दुर्घटना स्थलावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार चाफले करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular