Thursday, April 30, 2026

स्कुलव्हॅनला अपघात; 10 विद्यार्थी जखमी

गोंदिया : एका खासगी शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलव्हॅन पलटल्याने 10 विद्यार्थी जखमी झाले. ही घटना सेजगाव ते नहरटोला मार्गावर आज गुरुवार, 30 जानेवारीला सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. काचेवानी येथील एका खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना स्कूलव्हॅन घेऊन जात होती. मात्र, गंगाझरी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सेजगाव ते नहरटोला मार्गावर शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलव्हॅन पलटल्याने 10 विद्यार्थी जखमी झाले. घटनास्थळी गंगाझरी पोलीस दाखल झाली असून चालकाला ताब्यात घेतले आहे. जखमी विद्यार्थ्यांना उपचाराकरीता रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular