महुआ डिस्टिलरीच्या १८ सप्टेंबरच्या जनसुनावणीला खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा तीव्र विरोध
गोंदिया : गोरेगाव MIDC येथील A-12 मध्ये प्रस्तावित 5 KLPD महुआ फूल/फळ आधारित स्पिरिट डिस्टिलरी व Blending & Bottling Unit च्या दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या सार्वजनिक सुनावणीला खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, ही सुनावणी तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे.





