Monday, April 13, 2026
spot_img

शिवस्वराज्य सप्ताहानिमित्त किल्ला प्रतापगड येथे स्वच्छता अभियान

अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले स्वच्छता अभियान व कार्यकर्ता मेळावा रविवार, 23 फेब्रुवारी रोजी किल्ला प्रतापगड पायथा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शिवस्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजि. राजकुमार बडोले होते. यावेळी आमदार बडोले यांनी, शिवरायांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घ्यावी, असे आवाहन केले. स्वच्छता अभियानादरम्यान गड परिसरातील प्लास्टिक व अन्य कचरा गोळा करून स्वच्छ भारत संकल्प पूर्ण करण्यात आला. या मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular