Tuesday, May 12, 2026

पाणी गुणवत्ता प्रयोग शाळेला भेट द्या! : उपमुकाअ फरेंद्र कुतीरकर

प्रयोगशाळा सामान्य नागरीकांसाठी खुली
गोंदिया : पाणी हे जीवन आहे. शुध्द पाण्यावर प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. मात्र, आपण प्राशन करतो ते पाणी शुध्द करण्याच्या पध्दती कशा आहेत, यांची माहिती जाणून घेण्यासाठी, भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिनस्थ असलेल्या जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळा या सर्व सामान्य व्यक्तींना पाहणी करण्यासाठी खूल्या करण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळांना नागरीकांनी भेट द्यावी, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांनी केले आहे.
येत्या ९ जून रोजी जागतिक ॲक्रेडीएशन दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमीत्ताने भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने या प्रयोगशाळा सामान्य नागरीकांना भेट देण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. भेटीमध्ये कमीत कमी एक शाळा अथवा महाविद्यालय विद्यार्थी वर्ग कमीत कमी 10 संख्येमध्ये अथवा सरकारी कार्यालयातील कर्मचारीवृंद कमीत कमी 10 संख्येमध्ये प्रयोगशाळा पाहणी करू शकतील. भेटीत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणारे रासायनिक व जैविक घटक, तपासणी करतांना आवश्यक असणारी संयंत्रे, उपकरणे, ॲक्रीडीयेशन प्रक्रीयेची माहीती, एन.ए. बी. एल. प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर प्रयोगशाळेतील पाणी नमुने तपासणीमध्ये येणारी सुसूत्रता इत्यादीबाबत माहीती देण्यात येणार आहे. भेटीला आलेल्या गटास प्रत्यक्षात एक अथवा दोन संख्येमध्ये पाणी घटकांची तपासणी करुन दाखविण्यात येणार आहे. यासोबतच प्रयोगशाळेत जमा होणारे खाजगी पाणी नमुने माफक दरात प्रयोगशाळेमध्ये तपासणी करण्याची असलेल्या सोयीची देखील यावेळी माहीती देण्यात येणार असल्याचे जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ मुकेश त्रिपाठी यांनी कळविले आहे. दरम्यान शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, सरकारी कार्यालयातील कर्मचारीवृंद, सर्वसामान्य नागरीकांना प्रयोगशाळेतून मिळणारी माहीती उपयुक्त असून नागरीकांनी प्रयोगशाळेला भेट देण्याचे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक फरेंद्र कुतिरकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular