Sunday, January 18, 2026
spot_img

बनावट बिडी कारखान्यावर धाड : १८ नामांकित कंपन्यांचे बनावट बिडी पॅकेट्स जप्त

गोंदिया : रामनगर पोलिसांनी मंगळवारी (दि.१७) रात्री शहरातील एका बनावट बिडी बनविणाऱ्या कारखान्यावर व त्याच्या गोदामावर धाड टाकली. यात मोठ्या प्रमाणात बिडी तयार करण्याचे साहित्य, रॅपर्स, पॅकिंग मशिन जप्त केली आहे.
शहरातील पूनाटोली, लोकमान्य टिळक वॉर्ड येथील कारखान्यातून बनावट बिडीची हजारो पाकिटे व गोल बिडी, मंगलोर देसाई बिडी, मनोहर बिडी, मंगलोर गणेश बिडी, भारत बिडी, कोंब्रा ब्रँड बिडी, सबडे बिडी, मुर्गा ब्रँड बिडी, ५०२ नंबर बिडी, बादशाही बिडी आदीचे लेबल आणि इतर कच्चा माल आणि यंत्रसामग्री तसेच लाखो किमतीच्या बिड्या आणि तयार बिडी पॅकेट्स (कट्टे), भाजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंदूर जाळी, रिकामे रॅपर, फेविकॉल, गोंद, कच्चा माल आणि पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन जप्त केल्या आहेत. गोंदिया शहरात बनावट बिडी निर्मितीच्या कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली असता गोल बिडी कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजरच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी संबंधित गोदामावर धाड टाकून ही कारवाई केली. छत्तीसगडच्या धमतरी येथे तयार केलेल्या प्रसिद्ध ब्रँडेड गोल बिडी कंपनीच्या पॅकेटचा दर प्रति बंडल १७० रुपये आहे. परंतु गोंदिया सह जवळच्या शहरी बाजारपेठांमध्ये, मूळ बिड्यांसारख्याच बनवलेल्या या गोल कंपनीच्या बनावट बिड्या १३५ ते १४० रुपयांना विकल्या जात आहेत, ज्यामुळे मूळ गोल बिड्यांची विक्री कमी झाली आहे आणि कंपनीचे आर्थिक नुकसान हाेत होते.

साडेतीन लाख रुपयांचा माल जप्त…
रामनगर पोलिस स्टेशन गाठणारे कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर प्रवीण कुमार कदम यांनी याबाबत तक्रार केली, त्यानंतर शहरातील पुनाटोली येथील कारखान्याच्या गोदामावर छापा टाकताना ३.५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. यानंतर, त्यांच्या गोल बिडी ब्रँडच्या नावाने बनावट बिड्या तयार करण्याचे काम येथे सुरू असल्याच्या घटनेला दुजोरा मिळाला.

तीन आरोपींवर गुन्हा दाखल…
गोल बिडी कंपनीचे निरीक्षक राजेश भुरे यांच्या तक्रारीवरुन हा बनावट बिडीचा कारखाना चालविणारे आरोपी माणिकलाल बोडलू पानतवणे (वय ५६, राहणार पुनाटोली), आकाश माणिकलाल पानतवणे (२९, रा. पुनाटोली), देवेंद्र टिळकचंद गजभिये (वय ३६, मोहगाव) यांच्या विरुद्ध कॉपीराइट कायद्याचे कलम ५१, ६३,१०३), कलम १०४ अंतर्गत गुन्हा क्रमांक २३४/२५ अंतर्गत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular