Friday, April 17, 2026
spot_img

जिल्हास्तरीय अधिका-यांची गोर्रे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

गोदिया : आरोग्य विभागाचे जिल्हा स्तरीय अधिकारी यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मंगळवार, 17 जुन रोजी सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील गोर्हे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संवाद साधून आदिवासी, नक्षलभागात जाणवणार्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल आत्राम, गोर्रे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवतप्रसाद बारई, भरारी पथकचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुखदा पांडे यांचे सह प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करणारे सर्व उपकेंद्रांतील कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, फार्मासिस्ट, आशा गट प्रवर्तक उपस्थित होते. जिल्ह्यात गोर्हे सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम, जंगलव्याप्त व शेवटच्या टोकावरील आरोग्य संस्था आहे.अधिकार्यांनी गोर्हे कार्यक्षेत्रात आदिवासी भागातील गावांमध्ये येथे काम करत करताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामेळे तिथे उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी कर्मचारी व गावकऱ्यांची उत्तम संवाद समजुतपणा व साथ असणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी माता व बाल प्रजनन कार्यक्रम अंतर्गत लहान बालक, किशोरवयीन मुले मुली, गरोदर माता, स्तनदा माता, वयोवृद्ध यांना अतिजोखमी प्रसंगी आरोग्य सेवा देतानाचे विविध अडचणीची माहीती जाणुन घेतली.तसेच आरोग्य सेवा देताना देण्यात येणारा पोषण आहार व कुपोषण या विषयावर अंगणवाडी सेविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आदिवासीबहुल क्षेत्रात विविध साथीचे आजार त्यासोबत सिकलसेल, क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग बाबत त्यांची अंधश्रद्धा विचारसरणी यावर चर्चा केली. जंगलव्याप्त भाग असल्याने पावसाळ्यात कुत्राचावा,सर्पदंश व विंचुदंश याबाबतचे माहीती घेतली. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी किटकजन्य व जलजन्य आजाराबाबतची माहीती जाणुन घेवुन कार्यक्षेत्रात किटकजन्य आजाराचे प्रमाण करण्यासाठी विविध मुद्द्यावर चर्चा केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular