Wednesday, January 21, 2026
spot_img

गोंदिया-हैदराबाद उड्डाणसेवा आठवड्यातून तीनच दिवस

गोंदिया : विमानसेवेत उदभवणार्‍या समस्या आणि काही दिवसांपुर्वी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेमुळे हवाई प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विमान कंपन्याही पूर्वीपेक्षा अधिक सावध झाल्या आहेत आणि विमानांच्या देखभाल आणि तांत्रिक तपासणीसाठी खबरदारी घेतली जात आहे. याच अनुषंगाने गोंदिया जवळील बिरसी विमानतळावरून दररोज उड्डाण भरणारी गोंदिया-हैदराबाद विमानसेवा आता आठवडयातून तीनच दिवस देण्याचा निर्णय इंडिगो विमान कंपनीने घेतला आहे. येत्या 2 जुलैपासून पुढील निर्णयापर्यंत बिरसी विमानतळावरून दररोज चालवल्या जाणार्‍या इंडिगो विमान कंपनीचे विमान आता आठवड्यातून फक्त तीनच दिवस म्हणजे मंगळवार, गुरूवार व शनिवार या वारी हैदराबादसाठी उड्डाण भरेल, असे गोंदिया विमानतळ प्राधिकरणाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून कळविले आहे. यासंदर्भात बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक गिरीशचंद वर्मा यांनी सांगीतले की हा निर्णय इंडिगोचा आहे. विमानतळ दररोज अधिक उड्डाण सेवा देण्यास सक्षम आहे. जुलैच्या अखेरीस रात्रीची सेवा सुरू करण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले. इंडिगोच्या बिरसी विमानतळाच्या व्यवस्थापक यांनी सांगीतले की, इंडिगोची हैदराबादला जाणारी दैनंदिन विमानसेवा आता 2 जुलैपासून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू राहील. विमानाच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही. कंपनी सप्टेंबरपासून नियमित विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्नात असल्याचे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular