Tuesday, March 10, 2026
spot_img

गोंदिया जिल्हा बँकेवर पुन्हा महायुतीचे वर्चस्व; महायुती 11 तर आघाडीचे 9 संचालक विजयी

गोंदिया : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाकरीता झालेल्या निवडणूकीत 11 संचालक महायुतीचे तर 9 संचालक हे महाविकास आघाडी व सेवा सहकारी समर्थित पॅनलचे निवडून आले आहेत. या निवडणूकीत माजी आमदार दिलीप बनसोड यांच्यासह बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, संचालक उषा मेंढे, रेखलाल टेंभरे, राजकुमार कुथे, राजू एन. जैन, गजानन परशुरामकर या दिग्गजांना पराभवाचा फटका बसला.
आज ३० जून रोजी झालेल्या निवडणूकीच्या मतमोजणीत सेवा सहकारी तालुका गटातून आमगाव- भेरसिंग नागपुरे (महायुती), देवरी प्रमोद संगीडवार(महायुती), सालेकसा बंटी कटरे (महविकास आघाडी), गोंदिया केतन तूरकर (महायुती), सड़क अर्जुनी-गंगाधर परशुरामकर (महविकास आघाडी परिवर्तन पॅनल), गोरेगांव -दुर्गाप्रसाद ठाकरे (महविकास आघाडी परिवर्तन पॅनल), तिरोड़ा-आमदार विजय रहांगडाले(महायुती), औद्योगिक-अरुण दुबे (महविकास आघाडी परिवर्तन पॅनल), मोरगांव अर्जुनी-केवळराम पुस्तोडे(महायुती), दूध संघ गट पंकज यादव (महविकास आघाडी परिवर्तन पॅनल), मजूर संंघ गट- विजयसिंह राठोड (महविकास आघाडी परिवर्तन पॅनल), जंगल कामगार अशोक गप्पू गुप्ता (महविकास आघाडी परिवर्तन पॅनल), मच्छीमार संघ गट-अजय हलमारे (महविकास आघाडी परिवर्तन पॅनल), ओबीसी गट डॉ.अविनाश जायसवाल, महिला गट रचना गहाणे, प्रिया हरिणखेड़े, अनु.जाती जमाती गट आमदार राजकुमार बडोले, व्हीजेएनटी गट विनोद कन्नमवार (महायुती), वैयक्तीक मतदार गटातून प्रफुल्ल अग्रवाल (महविकास आघाडी परिवर्तन पॅनल निर्विरोध) व पगारदार गटातून राजेंद्र जैन (महायुती निर्विरोध) विजयी झाले. महायुतीप्रणित सहकार आघाडीने 11 जागा जिंकत बँकेवर आपले वर्चस्व कायम ठेवले असून माजी अध्यक्ष राजेंद्र जैन हे पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या मातब्बर नेत्यांनी आखलेल्या व्यूहरचनेवर सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेस महाविकास आघाडीने चांगली कामगिरी करीत 9 संचालक निवडून आणल्याने एकतर्फी विजयाचा सहकार पॅनलचा बेत उडविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular