Thursday, April 30, 2026

ककोडी येथे आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर

गोंदिया : जिल्ह्यात धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान 49 गावात राबविण्यात येणार आहे. त्यातुन शासनाच्या विविध योजना व त्याचा लाभ गावपातळीवरील आदिवासी लोकांना पोहचविणे आहे. जिल्हाचे शेवटचे टोक असलेल्या ककोडी येथे 27 जुन रोजी ग्रामपंचायत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडी यांचे मार्फत धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आरोग्य मेळाव्यात आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर संपन्न झाल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी रामटेके यांनी दिली आहे.
27 जुन रोजी ककोडी येथील आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान आरोग्य मेळावा घेण्यात आले. यामध्ये शासनाच्या सर्व विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडीच्या वतीने आरोग्य विभागाचा स्टॉल लावण्यात आला. या ठिकाणी अंसासर्गिक कार्यक्रमाच्य अनुशंगाने रक्तदाब व मधुमेह तपासणी, सिकलसेल तपासणी, रक्तगट सोबतच गरजु लोकांची वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत आरोग्य तपासणी व समुपदेशन करुन औषधोपचार करण्यात आला. आरोग्य विभागाच्या जनजागृती स्टॉल मध्ये क्षयरोग, कुष्ठरोग, सिकलसेल, हिवताप, स्टॉप डायरीया, मलेरिया व इतर राष्ट्रीय कार्यक्रमाच्या बॅनर व पोष्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आल्याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी रामटेके यांनी याप्रसंगी दिली आहे. 27 जुन रोजी संपन्न झालेल्या धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान आरोग्य मेळाव्या दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी रामटेके व डॉ. सैय्यद आरोग्य सेविका प्रिती कळमकर, आरोग्य सेवक ढालीसंग बिसेन, आशा सेविका धनुबाई धनगाये, राजकुमारी मडावी, सुशिला सलामे, स्टाफ़ ब्रदर राजेश घाटे, डाटा एन्ट्री ऑपरेटर आशिक अंबादे, गट प्रवर्तक शोभा राऊत व ललिता पटले यांनी उपस्थिती राहुन आरोग्य सेवा दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular