Monday, April 13, 2026
spot_img

कारवर झाड कोसडल्याने दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी

गोंदिया : रस्त्याच्या कडेवरील झाड पुन्हा एकदा धावत्या मारुती कारवर पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आज, बुधवार ९ जुलै रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे कोहमारा-गोंदिया मार्गावरील पेट्रोलपंप परिसरात घडली. वासुदेव खेडकर व आनंदराव राऊत अशी मृतांची नावे आहेत. तीन दिवसांपूर्वी तिरोडा तालुक्यातील सतोना-बोपेसर मार्गावरील झाडावर वीज पडून झाड धावत्या दुचाकीवर कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आज, पुन्हा रस्त्याच्या कडेवरील झाड कर्दनकाळ ठरला आहे.

सडक अर्जुनी शहरात गोंदिया-कोहमारा मार्गावरील पेट्रोलपंप परिसरात कोहमाराच्या दिशेने आज, सकाळी ९ वाजताच्या सुमारास जात असलेल्या एमएच ३१ सीआर १५४९ क्रमांकाच्या मारुती ओमनी कारवर रस्त्याच्या कडेवरील आंब्याचा झाड पावसामुळे कोलमडून पडला. या घटनेत मारुती कारमध्ये बसलेले वासुदेव खेडकर व आनंदराव राऊत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, कारवर झाड कोसळताच मागून येत असलेल्या टोयोटा कार चालकाचा स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने ती कारही रस्त्याच्या शेजारील दुसऱ्या झाडावर धडकली. ज्यामध्ये त्या कारमधील चालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी या विचित्र अपघाताची माहिती डूग्गीपार पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्याला सुरुवात केली आहे. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. बातमी लिहीपर्यंत पोलिस व स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरू होते तर जखमींची नावे कळू शकली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular