गोंदिया : पर्यावरण ही काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊन पर्यावरणाला अधिक हरित करण्यासाठी रविवार, 13 जुलै 2025 रोजी कारंजा येथील पोलीस मुख्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम बाँब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, मोटर परिवहन विभाग आणि हिरवळ बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडला.
वृक्षारोपण कार्यक्रमात, बाँब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, मोटर परिवहन विभाग येथील कार्यरत पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच हिरवळ बहुउद्देशीय संस्थेची संपूर्ण टीमचे सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये वड, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ, आंबा, चिकू , फणस, गुलमोहर, इत्यादी यांसारख्या देशी वृक्षांचा समावेश होता. वृक्षारोपण पोलीस अधीक्षक गोरख भामरे, पोलीस उप-अधीक्षक (गृह) शेवते, पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने बॉम्ब शोधक व नाशक पथकचे प्रभारी अधिकारी पो.नि. प्रवीण मुंडे, रा.पो.नि. राजेश सरोदे, श्वान पथकचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक सतीश सिरिया, मोटर परिवहन विभागचे पर्यवेक्षक चंद्रशेखर कटरे आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी झाडे लावून, त्यांना पाणी देऊन आणि त्यांची निगा राखण्याची शपथ घेतली. कार्यक्रमसाठी हिरवळ बहुउद्देशीय संस्थेचे दीपक भाई परमार, प्रताप आसवानी, हेमंत पटेल, पीनल पटेल, राहुल राठौड़, मनोज निर्मल, मंगेश तिडके, सुमित गुप्ता, सुप्रीत बैस, सौरभ गौतम, छत्रपाल शहारे आणि संपूर्ण टीमने सहकार्य केले.





