Thursday, April 30, 2026

एनएमडी कॉलेजच्या बाजूचा नाल्यावरील पूल खचला

गोंदिया : जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. त्यातच पावसामुळे शहरातील एन. एम. डी. महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या नाल्यावरील पूल खचला. ही घटना आज शनिवारी (ता. 26) रोजी दुपारच्या सुमारास घडली. नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेजच्या समोरील रस्त्यावर दिवस-रात्र दुचाकी, चारचाकी व जड वाहनांची ये-जा सुरु असते. तसेच नमाद महाविद्यालय आणि डी. बी. सायंस महाविद्यालयांच्या विदयार्थ्यांची, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची ही संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हा रस्ता वर्दळीचा असते. मात्र, आज नाल्यावरील पूल अचानक खचल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वाहतूक विभागाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेट्स लावण्यात आले. नागरिकांनी नाल्यावरून सावध राहून ये – जा करावे, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष घालून नाल्यावरील खचलेल्या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular