Sunday, January 18, 2026
spot_img

छळाला कंटाळून MBBS विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न?; गोंदिया मेडिकल कॉलेजतील घटना

प्राध्यापक मानसिक त्रास देत असल्याचा आरोप…
गोंदिया : गोंदिया (Gondia medical College) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत असलेल्या राजस्थान येथील आवेश कुमार नामक विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज (दि.११) उघडकीस आली असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा.डाॅ. प्रशांत बागडे यांनी सदर विद्यार्थ्याच्या आईबद्दल अपशब्द बोलून विद्यार्थ्याचा मानसिक छळ केल्याचे सदर विद्यार्थ्याने लिहिलेल्या सुसाईड पत्रावरुन दिसून येत आहे. सदर विद्यार्थ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
सदर विद्यार्थ्याचा पत्र हाती लागला असला तरी पत्राची सत्यतेबद्दल अधिकृत बोलता येत नसले तरी सदर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला उद्देशून शिक्षकाचे वर्तन चांगले असायला हवे, वाटल्यास विद्यार्थ्याला शिक्षा द्यायला काही हरकत नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या आईवडींलाबाबत अपशब्दाचा वापर करुन मानसिक छळ करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. आपल्याकडे असलेल्या एका व्हीडीओतील संभाषण हे आपण बोलले त्यापेक्षा १० टक्के सुुध्दा नाही असे म्हटले आहे. भविष्यात कुठल्याही विद्यार्थ्यासोबत असा व्यवहार करु नये असे म्हणत माझ्या या निर्णयात माझ्या कुठल्याही मित्र मैत्रिणिंचा सहभाग नसल्याचा उल्लेख करीत माझ्या आईवडीलांकडे लक्ष द्यावे असाही उल्लेख केला आहे.
यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. कुसुमागर घोरपडे यांच्याशी माहिती घेतली असता सदर प्रकरण खरे असून विद्यार्थ्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्या विद्यार्थ्याने केलेल्या कृत्याची चौकशी सुरु करण्यात आली असून चौकशी अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. सदर विद्यार्थी वर्गात अनेकदा गैरहजर राहत असल्याने त्यास प्रा. बागडे यांनी काही बोलले असेल त्याचा त्याने मनावर घेतल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular