येडमाकोट फाट्याजवळील घटना
तिरोडा, (गोंदिया) : तुमसर मार्गावरील येडमाकोट येथून मुंडीकोटाकडे ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीला तिरोडाहून अकोल्याकडे जात असलेल्या भरधाव इनोव्हा कारने धडक दिली. यात दुचाकीवरिल तिघे जण गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. येडमाकोट येथील लक्ष्मण दमाहे दुचाकी क्रमांक एमएच ३५ एपी ३४५१ ने पत्नी व नातिनीं सोबत मुंडीकोटाकडे जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा कार क्रमांक MH 22 k 0990 ने धडक दिली. या धडकेत तिन्ही जण रस्त्याच्या खाली पडून गंभीर जखमी झाले. लक्ष्मण दमाहे, कोल्हाबाई दमाहे व सोनी भरत बन्नाटे (वय २० वर्षे) यांच्या समावेश आहे. त्यांना आधी तुमसर येथील रुग्णालयात प्रथमोपचाराकरिता नेण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता भंडारा येथे पाठविण्यात आले. अपघात स्थळी मोठा जमाव एकवटला होता. काही वेळ वाहतूक कोंडी झाली. यावेळी तिरोडा पोलिस स्टेशनचे शिपाई विदेश अंबुले, प्रणव तिवारी, वाहतूक पोलीस विनोद चवळे, महिला शिपाई नयना व स्थानिक लोकांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.





