Tuesday, May 26, 2026

देवरी येथे आदिवासी वेशात थिरकले अधीकारी व कर्मचारी

उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांचा सत्कार : जागतिक आदिवासी दिन उत्साहात
देवरी, (गोंदिया) : देवरी येथे पहिल्यादाच आदिवासी दिनानिमित्त आयोजित सभेत देवरीचे उपविभागीय अधिकारी कार्यालय , प्रकल्प कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. सभेत देवरी सह आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सभेत उपस्थित होते.
हा कार्यक्रम आदिवासी सांस्कृतिक सभागृहात देवरी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी शहराचे प्रथम नागरिक म्हणून न.पं. चे अध्यक्ष संजू  उईके, विशेष अतिथी म्हणून देवरीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड  प्रामुख्याने उपस्थित होत्या. यात विशेष म्हणजे  कविता गायकवाड आदिवासी पोशाखात उपस्थित झाल्यामुळे संपूर्ण सभागृहाचे लक्ष त्याच्या पेहनाव्याकडे होते , त्याचा आदिवासी पोशाख अनेक आदिवासी महिलांना लाजवेल असे होते. त्यामुळे बहुतेक आदिवासी महिलांचे भुवया उंचावले होते . यावेळी समाजाच्या वतीने कविता गायकवाड यांचे शाल श्रीफळ देऊन सामाजिक सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमात  मार्गदर्शन करताना गायकवाड मेडम यांनी आपल्या कोकणी आदिवासी संस्कृतीबद्दल वाध्य, नृत्य, लग्न विधी या परंपरेबद्दल भरभरून बोलत निसर्गप्रेम त्याच्या जीवनात किती महत्वाचे आहे, हे सांगितले. मी कोकणी आदिवासी असलो तरी आपली संस्कृती एक आहे. आपण आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा असे ते यावेळी म्हणाल्या. या प्रसंगी प्रस्ताविकात एम्प्लॉई नेते चेतन उईके यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडून, गोंदिया येथे आदिवासी मुला- मुलींकरिता वस्तीगृहासाठी जागा उपलब्द करून देण्याची मागणी केली. यावर देवरीचे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी विविध योजनेबद्दल माहिती देत वस्तीगृहाकरिता जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. याच बरोबर न.पं.चे अध्यक्ष संजू उईके यांनी देवरी येथी वॉर्ड नंबर १ ला पुढील सभेत प्रस्ताव मांडून महामानव बिरसा मुंडा नगर करण्याची घोषणा केली. शेवटी सभेचे अध्यक्ष लोकनाथ तितराम यांनी सभेला संबोधित करताना समाज संघटित करण्याचे आव्हान करत उपस्थितांचे विशेष आभार मानले. यावेळी माजी आमदार सहषराम कोरोटे, आदिवासी नेते रमेश ताराम, नरेंद्र गावळकर, पं.स. सदस्य अनुसया सलामे, भारतीताई सलामे, वैशाली पंधरे, छायाताई मडावी, दिलीप कुंभरे, अनूप नळपते, उमेश मडावी, शाम मडावी, अविरत सायाम, टीकाराम मातवारे, संजू गेडाम, मधू दिहारी, लोकेश ताराम उपस्थित होते. यात विशेष म्हणजे आदिवासी दिनानिमित्त प्रथम चिंतन सभा आयोजित करण्यात आली होती. सभा सकाळी ११ वाजता सुरु झाल्यानंतर २ वाजता दरम्यान सभा आटोपते घेतले. या नंतर शहरात भव्य आदिवासी स्वाभिमान  रैलीचे आयोजन करण्यात आले होते. रैली प्रकल्प कार्यालयापासून दीक्षा भूमी, मस्कऱ्या चौक, दुर्गा मंदिर चौक, राष्ट्रीय महामार्ग वळते घेत गोंड वीरांगना दुर्गावती चौक येथे विशाल सामूहीक नृत्य करून , या रैलीचे समारोप करण्यात आले. या दरम्यान विद्यमान आमदार संजय पुराम , प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांच्यासह माजी सभापती अंबिका बजार,  देवकीताई मरई यांनी आदिवासी नृत्याचा ठेका घेतला. अशा प्रकारे देवरी येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular