Wednesday, August 19, 2026
spot_img
spot_img
spot_img

आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते ठिकठिकाणी ध्वजारोहण

गोंदिया : उद्या शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
यानिमित्त देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. शहरासह क्षेत्रातील विविध ठिकाणी आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे. उद्या (ता.१५) सकाळी ८ वाजता शहरातील जयस्तंभ चौक, ८.१५ वाजता कालेखा चौक, ८.३० वाजता माताटोली शाळा, ८.४५ वाजता गौरीनगर, ९ वाजता शिव चौक संजयनगर (गोंविदपूर), ९.१० वाजता कव्वाली मैदान, गोविंददपूर, ९.२० वाजता चावडी चौक छोटा गोंदिया, ९.३० वाजता त्रिमुर्ती चौक सिव्हील लाईन, १० वाजपेयी चौक, १०.३० वाजता मुस्लीम मायनारिटी ट्रस्ट मरारटोली, ध्वजारोहण करणार आहेत. तर सकाळी ११ वाजता सावरी येथील ग्राम पंचायतीच्या नविन भवनाचे लोकार्पण, ११.३० वाजता फुलचूर येथे ओपन जीमचा लोकार्पण व पुरस्कार वितरण सोहळात उपस्थित राहणार आहेत. आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular