Tuesday, September 15, 2026
spot_img
spot_img
spot_img

नवनियुक्त संचालक मंडळाचा सत्कार सोहळा उद्या; खासदार पटेलांच्या हस्ते होणार सत्कार

गोंदिया : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकीत महायुतीने भरघोष यश संपादन केले. दरम्यान बहुमतांनी निवडून दिलेल्या भंडारा व गोंदिया जिल्हाच्या बँक, दुग्ध, मच्छीमार संघातील नवनिर्वाचित संचालक व पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा रविवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल, आ.डॉ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, आ. राजकुमार बडोले, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. विनोद अग्रवाल, आ. संजय पुराम, आ.राजूभाऊ कारेमोरे, भाजपाचे समन्वयक विरेंद्र अंजनकर, प्रदेश सचिव धनंजय दलाल आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सत्कार समारंभाला गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित संचालक व पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्याला महायुतीच्या सर्व सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन, अर्बन बँक भंडाराचे अध्यक्ष नाना पंचबुद्धे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, दुग्ध संघ भंडाराचे अध्यक्ष विलास काटेखाये, गोंदिया जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघाचे अध्यक्ष मुकेश शिवहरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular