Thursday, April 30, 2026

ज्ञानोबा माऊलीच्या गजरात संत ज्ञानदेवांची पालखी मिरवणूक

सुवर्ण महोत्सवी सप्तशतकोत्तर ७५० वी जयंतीनिमित्त नगरपंचायतचा उपक्रम…
अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : ज्ञानेश्वर महाराज (संत ज्ञानेश्वर) हे १३ व्या शतकातील एक महान संत आणि कवी होते. त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव,चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ असे अनेक महत्वाचे ग्रंथ लिहिले आहे. संत ज्ञानेश्वर रचित ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अजरामर आहे. संत परंपरेतील एक महान संत म्हणून संत ज्ञानेश्वरांची ओळख. हे वर्ष संत ज्ञानेश्वरांचे सुवर्ण महोत्सवी सप्तशतकोत्तर वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शासनाच्या वतीने साजरे होत आहे. संत ज्ञानेश्वरांच्या 750 व्या जयंती महोत्सवानिमित्त नगरपंचायत अर्जुनीच्या वतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, सभापती यशकुमार शहारे, सभापती दानेस साखरे, सभापती संध्या शहारे, नगरसेवक राधेश्याम भेंडारकर, नगरसेविका ममता भैया, इंदू लांजेवार, शीला उईके, सपना उपवंशी, दीक्षा शहारे, दिव्या पसीने, सुषमा दामले, मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाने यांनी संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा, ज्ञानेश्वरी ग्रंथ आणी पालखी पूजन करून मिरवणुकीचा शुभारंभ केला. वारकरी वेशभूषेत नगरसेवक,नगरसेविका कर्मचारी आणि उपस्थितांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. ज्ञानोबा माऊली तुकाराम,विठ्ठल विठ्ठल विठ्ठला,ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्वर या गजरांनी शहर दुमदुमले. जय दुर्गा भजन मंडळाचे शंकर झोळे, रामदास खांदाडे, राजेश वलथरे, लीलाधर यावलकर, सुधाकर घोडाम, बळीराम हातझाडे, ओम प्रकाशसिंह पवार, देवानंद गजापुरे, गीता ब्राम्हणकर यांच्या भजनांनी मिरवणूकीत उत्साह भरला. मिरवणुकीची सुरुवात नगरपंचायत कार्यालयातून झाली. शहरातील मुख्यमार्गांनी प्रवास करीत सिव्हिल लाईन स्थित विठ्ठल मंदिरामध्ये समारोप झाला. यावेळी शारदा बडोले, किशोर तरोने, प्रशांत शहारे यांनी पालखीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल बंड, दिलीप उके, एकनाथ चव्हाण, सुमित मेश्राम, शुभम गौरकार, योगेश्वरी मेश्राम, दीप्ती भाजीपाले, घनश्याम हातझाडे, दुर्योधन नेवारे, गौरव शहारे, दीपक राऊत, सुरेश बोरीकर, नयन शहारे, आशा सेविका यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular