Thursday, April 30, 2026

देवरीतील अवैध दारू विक्रेतास केले तडीपार

देवरी उपविभागातील देवरी, आमगाव, सालेकसा तालुक्यातुन हद्दपार
देवरी, (गोंदिया) : देवरी पोलीस ठाणेंतर्गत येणाऱ्या मरामजीब येथील एका दारू विक्रेत्याला उपविभागीय दंडाधिकारी यांनी ६ महिन्याकरिता तडीपार केले. ही कारवाई २१ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली असून देवरी उपविभागातील देवरी, आमगाव, सालेकसा तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. चुन्नीलाल रामाजी नंदेश्वर (वय ५२, रा. मरामजीब, ता. देवरी) असे आरोपीचे नाव आहे.
गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे सुचनेप्रामणे अभय डोंगरे अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग देवरी, यांच्या मार्गदर्शनात देवरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षण प्रविण डांगे यांनी या हद्दीतील इसम चुन्नीलाल रामाजी नंदेश्वर रा. मरामजीब यांचा विरुध्द पोलीस स्टेशन देवरी येथे २०१७ ते सन २०२४ पर्यंत अवैध महाराष्ट्र दारूबंदी विक्रीमुळे गावातील कुटुंबे उध्वस्त होत आहे. समाजातील नितीमत्ता खालावुन महिलांना व विदयार्थांना याचा नाहक त्रास होत असल्याने उपविभागीय दंडाधिकारी देवरी कविता गायकवाड यांच्याकडे कलम-५६ (ब) (ब) मपोका अन्वये हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केले होता. या अनुषंगाने त्यांनी चौकशी व सुनावणी करुन चुत्रीलाल रामाजी नंदेश्वर या अवैध दारू विक्रेत्या जिल्हा गोंदिया देवरी या उपविभागातील देवरी, आमगाव, सालेकसा या तालुक्यातुन ६ महिण्याकरीता हद्दपार करण्याचे आदेशित केले आहे. या बाबद सदर इसमास आदेशाची प्रत तामील २१ ऑगस्ट २०२५ रोजी देवरी उपविभागातील देवरी, आमगाव, साले तालुक् हद्दपार करण्यात आले आहे. पो. नि. प्रविण डाच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई करीता देवरी पोलीस स्टेशनचे पो. हवा. धर्मराज कटरे, मपोशि निता कांबळे पोलीस स्टेशन देवरी, यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular