Sunday, January 18, 2026
spot_img

रब्बीतील धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळणार; प्रफुल पटेल यांचा पाठपुराव्याला यश

केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी सकारात्मक चर्चा
गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. यंदा या दोन्ही जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली होती. पण त्या तुलनेत धान खरेदीचे उद्दिष्ट कमी दिल्याने मोठ्या प्रमाणात धान शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. याचीच दखल घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी आज केंद्रीय केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्ली येथे भेट घेवून रब्बीतील धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी केली. जोशी यांनी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची ग्वाही खासदार पटेल यांना दिली.
रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान विक्रीस आणले आहे. मात्र जिल्ह्याला ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्याने धान खरेदी बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रावरच पडून असून शेतकरी बिकट परिस्थितीत सापडले आहे. याचीच दखल घेत शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर खा. प्रफुल पटेल यांनी मंगळवारी केंद्रीय केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेवून त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. तसेच दाेन्ही जिल्ह्यातील शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहु नये यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी जोशी यांच्याकडे केली. या चर्चेत सकारात्मक फलित निघून आगामी एक-दोन दिवसांत धान खरेदीचे उद्दिष्ट देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यापूर्वीही खा. श्री प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्र सरकार मार्फत केंद्र सरकारला उद्दिष्ट वाढीसाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

शेतकऱ्यांची अडचणीची घेतली दखल…
बराच कालावधी लोटूनही शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रांवर पडून राहिल्याने अनेक शेतकऱ्यांना गरजेपाेटी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना स्वस्त दरात विक्री करावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे ते सातशे रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. याची खा.प्रफुल पटेल यांनी गांर्भीयाने दखल घेत तातडीने केंद्रीय केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्र्यांची भेट घेवून धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular